५२ व्या घटना दुरुस्तीत १९८५ पासून देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला. एक तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही अशी तरतूद करण्यात आली होती. सदस्य अपात्र कसा ठरतो. पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.अन्य पक्षात प्रवेश केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.
अन्य पक्षांच्या बैठकांना हजेरी लावल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा २००३ मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकते.
राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने आमदारांना उद्देशून शरद पवार यांनी पक्षांतर बंदी कायद्याची आठवण करून दिली आहे.
त्या पार्श्वभूमीवर पक्षांतर बंदी कायद्याद्वारे आमदारांवर काय कारवाई होते. यावर शरद पवार यांनी आपल्या आमदारांचे काम टोचले आहेत.