सेटवरील महिलांसाठी सलमानने घातला होता नियम, पलक तिवारीने केला खुलासा

8

मुंबई,१३ एप्रिल २०२३ : पलक तिवारी ही टेलिव्हिजन स्टार श्वेता तिवारीची मुलगी आहे आणि ती हार्डी संधूच्या “बिजली बिजली’ म्युझिक व्हिडिओमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी अली. आता ती ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये तिला सलमान खान बरोबर काम करण्याची संधी मिळाली. सलमान बद्दल बोलत असताना चाहत्यांना तिने त्याचे काही नियम सांगितले.

एका मुलाखतीत पलकने हा खुलासा केला. ती म्हणाली, किसी का भाई किसी की जान मध्ये सलमानसोबत काम करण्याची माझी पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटासाठी तिने सहाय्य केले होते, ज्यात सलमान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्या चित्रपटादरम्यान सलमानने सेटवर सर्व महिला क्रू मेंबर्ससाठी लागू केलेला एक नियम तिने उघड केला आणि सांगितले की या नियमामुळे तिची आई अतिशय खुश होती.

सलमान प्रत्येक देसी आईप्रमाणेच मी जे कपडे घालते त्याबद्दल नेहमीच भाष्य करत असे. ते नेहमीच आम्हाला हवे ते कपडे घालण्यास प्रवृत्त करायचे परंतु जेव्हा मी ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ करत होतो तेव्हा सलमान सरांचा एक नियम होता: ‘माझ्या सेटवरील प्रत्येक मुलीची नेकलाइन योग्य असावी आणि सेट वरील सर्व मुलींचा पोशाख हा त्यांचे शरीर झाकणार असावा.’ पुढे ती म्हणाली,”जर आजूबाजूला असे पुरुष असतील ज्यांना ते वैयक्तिकरित्या ओळखत नाही, तर त्यांच्यावर पाळत ठेवणे त्यांना प्रश्न करणे बरोबर नाही. सेटवर अनेक लोकांची ये-जा असते, अशावेळी सेटवरील प्रत्येक मुलगी ही सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी हा नियम घालून दिला होता.

सलमान बरोबर ती चित्रपटात झळकणार असल्याने तिची आई खुश असल्याचे तिने सांगितले.फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पुजा हेगडे देखील आहेत. व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, राघव जुयाल. सिद्धार्थ निगम. विजेंदर सिंग आणि इतर कलाकारांसह हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा