गोल पोस्ट महाराष्ट्र पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले

पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. ३.५ रिश्टर स्केल ऐवढी या भूकंपाची तिव्रता होती. भूकंपाच्या धक्काने काही नुकसान झाले नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत.
नोव्हेंबर २०१८ पासून पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसत आहे. आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे याठिकाणच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरणा आहे. आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तिव्रता सौम्य होती. मात्र या आधी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांना तडे गेले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे भयभित झालेल्या गावकऱ्यांनी स्तलांतर केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version