गोल पोस्ट राजकारण शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल

शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल

दिल्ली: सत्तास्थापनेचा गुंता सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असताना संजय निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) जात काँग्रेसने मोठी चूक केली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस रसातळाला गेली. त्यातून काँग्रेसला आतापर्यंत सावरता आलेल नाही. महाराष्ट्रात आपण पुन्हा हीच चूक करत आहोत, अशा आशयाचे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सामील होणे काँग्रेसला खड्ड्यात गाठण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी दबावात येऊ नये, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.

error: Content is protected !!
Exit mobile version