पालखी सोहळा पूर्वीप्रमाणेच पार पडणार: राणा महाराज वासकर

पंढरपूर, दि. ६ मे २०२०: महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट आले आहे. असे असले तरी पालखी सोहळा पूर्वीप्रमाणेच पार पाडण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी व राष्ट्रीय वारकरी पाईक समितीचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी ही भूमिका मांडली आहे.

राज्यात आषाढी पालखी सोहळा जवळ आला आहे आणि त्यातच कोरानाचे संकट राज्यावर पडले आहे. त्यामुळे यावेळेस आषाढी पालखी सोहळा पार पडणार का ? यावर संभ्रम निर्माण झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख महाराज मंडळींची आज पंढरपुरात व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यामध्ये राणा महाराज वासकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा होऊ शकतो अशी भूमिका मांडली आहे.

यावर राणा महाराज भास्कर म्हणाले की, आत्तापर्यंत आमची सरकारशी कोणतीही चर्चा झाली नव्हती त्यामुळे आता सरकारने आमच्याशी चर्चा केल्यावर किंवा आम्ही सरकारशी चर्चा केल्यावर त्यामध्ये याविषयी मंथन केले जाईल आणि पालखी सोहळा कशाप्रकारे काढण्यात येईल याविषयी नियोजन आखले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा