महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी पंढरीनाथ नामुगडे तर उपाध्यक्षपदी गणेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

कदम वाकवस्ती, दि. १९ ऑक्टोबर २०२०: जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नामुगडे व धुमाळ यांची निवड करण्यात आली. थेऊर येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली, तालुक्यातील अनेक पत्रकार या बैठकीस उपस्थित होते. यामध्ये  सुरेश वांढेकर, यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. व तालुका कार्यकारीणीवर सल्लागार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, श्रीनिवास वाघ, विकास शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर कायदेविषयक सल्लागार म्हणून वीरेंद्र महाडीक, व श्रीनिवास पाटील, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच इतर कार्यकारीणीची पदे जाहिर करण्यात येतील असे बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सिताराम लांडगे म्हणाले की, पत्रकारीता करताना पत्रकार बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अनेक वेळा त्यांच्यावर बाका प्रसंग येतो. अशा परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आजपर्यंत करीत आलेला आहे. म्हणून पत्रकारांनी समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिताराम लांडगे यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा