सोलापूर,दि.७ जून २०२०: पंढरपूर तालुक्यातील रोपळे परिसरात द्राक्ष बागांवर हुमनी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायत शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.-त्यामुळे रासायनिक कीटक नाशक आणि बुरशी नाशकाच्या अति वापरामुळे बागा अडचणीत आल्या असून प्रदूषणवारही याचा परिणाम होतो आहे.
रोपळे परिसरातील मेंढापूर भागातील एप्रिल महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागांवर आता हुमणी अळीच्या भुंगेऱ्यानी द्राक्षबागांवरच हल्ला चढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रातोरात रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून त्यासाठी एकरी एक ते दीड हजार रुपये खर्च केले. मात्र रासायनिक कीटक नाशकाच्या फवारणीमुळे हुमणीच्या भुंगेऱ्यांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हुमणीचे नर-मादी भुंगेरे साधारणत: मार्च ते मे महिन्यात बांधावरील कडुनिंब व गुळवेलसारख्या वनस्पतींची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. याच दरम्यान नर-मादीचे मिलन होते. त्यानंतर हे भुंगेरे शेताच्या भळींमध्ये शिरून अंडी घालतात.
पोषक वातावरण तयार होताच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिकांचे अर्धवट कुजलेले अवशेष व कोवळ्या मुळ्या खातात. त्यामुळे उभी पिके वाळून जातात. सध्या हे भुंगेरे कडुनिंब आणि शेतातील द्राक्षबागांवर मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. त्यामळे पंढरपूरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: