पाणीपुरी विकून टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या ‘यशस्वी’ चे डोळे दिपवणारे यश.

यशस्वीची कथा बालपणात पाहिलेल्या एका स्वप्नापासून सुरू होते. क्रिकेटर होण्याचे हे स्वप्न त्याने आपल्या वडिलांकडे व्यक्त केले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मुलाला क्रिकेटर बनवता आले असते. यशस्वि ने वडिलांकडे असा हट्ट धरला की मुंबई मध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे त्याला पाठवण्यात यावे. रंग काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला थांबवले नाही आणि मुंबईच्या वरळी भागात राहणाऱ्या नातेवाईकाकडे पाठविले. यशस्वि च्या संघर्षाचा प्रवास येथून सुरू झाला. यशस्वि जयस्वाल ११ वर्षांचा असताना उत्तर प्रदेशातून मुंबईला आला. यानंतर त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी मुंबईतच सुरू झाली.
यशस्वी मुंबईला आला तर खरा परंतु ज्या नातेवाईकांकडे तो राहण्यासाठी आला होता तिथे राहण्यायोग्य पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. मुंबई मधील कालबादेवी भागातील एका डेअरीमध्ये यशस्वी ला राहण्याची संधी मिळाली परंतु येथे राहण्यासाठी त्याला त्या डेअरीमध्ये काम करण्याची अट घालण्यात आली होती. परंतु असे झाले नाही दिवसभर क्रिकेटचा सराव करून संध्याकाळी डेरी मध्ये आल्यावर त्याच्याकडून काम होत नसे त्यामुळे डेअरी मालकाने त्याला तेथून काढून टाकले.
यानंतर तो राहण्यासाठीही नवीन जागेच्या शोधात निघाला. वयाच्या ११ व्या वर्षी मुंबई क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणारे आझाद मैदान यशस्वीचे नवीन घर बनले. येथे त्यानी मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये तळागाळातल्या ग्राऊंड्समनबरोबर राहण्यास सुरवात केली. येथेही त्यांच्या मुक्कामासाठी अट ठेवण्यात आली होती. त्याला असे सांगण्यात आले होते की, इथे राहण्यासाठी इतक्या लोकांचा स्वयंपाक त्याला करावा लागणार तसेच याबरोबर खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी ही दाखवावी लागणार. दिवसभराच्या खेळानंतर व कामानंतर यशस्वी रात्री स्टेडियममध्ये झोपी जात असे.
यशस्वीने मुंबईतील आपला संघर्ष कधीही कुटुंबासह सामायिक केला नाही. त्याचे वडील खर्चासाठी काही पैसे पाठवत असत, परंतु ते कमी पडत असे. यशस्वीने पैसे कमावण्यासाठी बर्‍याच गोष्टी केल्या. बॉल अनेकदा आझादच्या मैदानावर हरवत असे. बॉल शोधणार्‍याला काही रुपये दिले दिले जात होते. त्यातून तो काही पैसे कमवू लागला. सामनावीर म्हणून कामगिरी केल्याबद्दल त्याला काही रुपये मिळत असे. या सर्वा व्यतिरिक्त त्यानी आझाद मैदानात होणाऱ्या रामलीला दरम्यान पाणीपुरी विकण्याचे काम ही केले होते. बर्‍याचदा असे घडले की तो पाणीपुरी विकत असताना त्याचे सहकारी खेळाडू तिथे येत असत. त्यांना येताना पाहून यशस्वी आपला ठेला सोडून तेथून निघून जात असे. जेव्हा मालक त्याला या प्रकाराविषयी विचारपूस करत असे तेव्हा तो सांगत असे हे कि मी इथे काम करतो पाणीपुरी विकतो असे त्यांनी मला बघितलेले आवडणार नाही त्यामुळे मी इथून निघून जातो.
या सर्व संघर्षानंतर गुरुवारी कोलकाता येथे झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला संघात सहभागी करून घेतले. रॉयल्सने यशस्वी जयस्वालला त्याच्या बेस प्राइसपेक्षा जास्त किमतीत त्याला संघात समाविष्ट केले आहे. दीर्घकाळ चाललेल्या बोलीनंतर त्याला दोन कोटी आणि ४० लाख रुपयांमध्ये संगा मध्ये समाविष्ट करण्यात आले. यशस्वीवरील पैशांच्या पावसा नंतर हे सर्व त्याच्या परिश्रमांचे फळ असल्याचे वडिलांनी म्हटले आहे.
यशवी जयस्वाल यांचे वडील भूपेंद्र जयस्वाल म्हणाले की, आमचे संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात आपले स्थान निर्माण करावे अशी आमची इच्छा आहे. यशस्विच्या यशाबद्दल त्याच्या गावाकडील लोक व नातेवाईक त्याचे अभिनंदन करीत आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषक संघात भाग घेणाऱ्या यशवीने अतिशय कमी वेळेत त्याने त्याचे स्थान निर्माण केले आहे. त्याने अगदी थोड्या कालावधीत आपल्या दमदार फलंदाजीमुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यशस्विने यंदा घरगुती क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफी २०१९ मध्ये मुंबईकडून खेळताना दुहेरी शतकासह तीन शतकांच्या मदतीने पाच सामन्यात ५०० हून अधिक धावा केल्या. आपल्या मुलाचे परिश्रम पाहून त्याच्या वडिलांनीही आपला मुलगा एक दिवस भारतीय संघामध्ये खेळेल हे स्वप्न बघण्यास सुरुवात केली होती. युवा टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा आयपीएल हा पहिला दरवाजा आहे. या आयपीएलने अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघाची जर्सी मिळवून दिली आहे.
यावर्षी झारखंडविरुद्ध त्याने १४९ चेंडूत पहिले दुहेरी शतक झळकावले आणि सर्वात कमी वयात असे करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. एवढेच नव्हे तर विजय हजारे ट्रॉफीच्या डावात १२ षटकार ठोकणारा तो सर्वोच्च खेळाडूही ठरला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा