नवी दिल्ली, दि.५ जून २०२०: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असणार्या विमान आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या विमानांप्रमाणे सुरक्षित असणार आहे.
येत्या सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एअर इंडिया वन’ च्या ताफ्यात दोन खास अपग्रेड केलेल्या बोईंग -७७७ विमानांमध्ये ‘सेल्फ प्रोटेक्शन सूट’ (एसपीएस) सज्ज असतील.
या विमानात इन्फ्रारेड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या विमानात क्षेपणास्त्रांची चेतावणी देणारी यंत्रणा असणार आहे. जी क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर,या विमानात शत्रूच्या रडार यंत्रणेला बाधा आणण्यास सक्षम तंत्रज्ञानासह सुसज्ज देखील असणार आहे. १४००कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: