गोल पोस्ट राष्ट्रीय पप्पी घेऊन बरे करणाऱ्या बाबाचा कोरोनामुळे मृत्यू

पप्पी घेऊन बरे करणाऱ्या बाबाचा कोरोनामुळे मृत्यू

मध्यप्रदेश, दि १२ जून २०२०: आजकाल आपल्या अवती भवती अनेक प्रकारचे भोंदू बाबा आपण पाहतो. जे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे प्रसिद्ध असतात. लोकांनाही त्यांच्यावर विश्वास बसलेला असतो. मात्र, कोरोनामुळे अशाच एका ” पप्पी बाबाचा ” मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हि घटना मध्य प्रदेशातील आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की , मध्यप्रदेशमध्ये एक भोंदू बाबा आपल्या भक्तांच्या हाताची पप्पी घ्यायचा त्यामुळे तो माणूस ठिक व्हायचा अशी लोकांची समजूत व्हायची. मात्र या पप्पी घेणाऱ्या बाबाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच्यामुळे त्याच्या २५ भक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

हा भोंदू बाबा आपल्या भक्तांना ताविज देऊन, त्यांच्या हाताचे चुंबन घ्यायचा त्यामुळे लोक आजारातून बरे होतात असा दावा तो करायचा. मात्र त्याचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे आता त्याच्या अनेक भक्तांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version