पडदा ओढणारा ते मराठीतील सुपरस्टार : लक्ष्मीकांत बेर्डे

उत्तम कलाकारांच्या गर्दीत एक नाव कायम अग्रस्थानी असेल ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

‘अशी ही बनवाबनवी’, ‘एका पेक्षा एक’, ‘चिकट नवरा’, ‘रंग प्रेमाचा’, ‘लपवाछपवी’, ‘बजरंगाची कमाल’ असे एका पेक्षा एक हिट मराठी चित्रपट देणारे लक्ष्मीकांत बेर्डे वयाच्या केवळ ५० व्या वर्षीच जगाचा निरोप घेतील असे कुणालाच वाटले नव्हते. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनातील काही टप्पे जाणून घेऊया…

रंगभूमीवर अभिनय करण्याआधी ते नाटकाचा पडदा ओढण्याचे काम करत. पडदा ओढणाऱ्या या तरुणाने एक दिवस पूर्ण पडदा कधी व्यापला ते समजलेच नाही.

‘मैंने प्यार किया’, ‘मेरी बीवी का जवाब नही’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘खंजर’, ‘बीवी और पडोसन’, ‘शिकार’, ‘रहस्य’, ‘गंगा मांगे खून’, ‘तकदीरवाला’, ‘हम आपके है कौन’, ‘दिलबर’, ‘गुमराह’, ‘बेटा’, ‘साजन’ हे काही गाजलेले त्यांचे हिंदी चित्रपट होते.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्याशी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला स्वानंदी व अभिनय असे दोन अपत्य आहेत.

‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पहिली. आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही.

लक्ष्मीकांत यांच्या जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशा तगड्या कलाकार मंडळींची साथही त्यांना मिळाली.
लक्ष्या म्हटले की, विनोदी अभिनेता ही त्यांच्यावर पडलेली छाप शेवट कायम राहिली. त्यांच्या ‘एक होता विदुषक’ या सिनेमाच्या अपयशाने ते खचून गेले.
सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा