मुंबई: सध्या दिल्लीसह देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएमटीसी या सरकारी मालकीच्या व्यापार संस्थेद्वारे परदेशातून हा कांदा आयात केला जाणार आहे. १५नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत नाफेड मार्फत कांद्याचा देशांतर्गत बाजर पेठेत पुरवठा केला जाणार आहे.