नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022: कंपनीने संसद टीव्हीचं यूट्यूब चॅनल सध्या बंद केलंय. Sansad TV बद्दल कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलंय की त्यांनी YouTube च्या Community Guidelinesचे उल्लंघन केलंय. मात्र, आता याबाबत संसद टीव्हीने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केलं आहे.
संसद टीव्हीने जारी केलेल्या एका प्रेस रिलीझमध्ये असं म्हटलंय की स्कॅमर्सनी त्यांच्या अकाऊंटला कोम्प्रोमाइज केलं आहे आणि YouTube या सुरक्षा त्रुटीचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला माहीत असंल की लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज संसद टीव्हीवरूनच लाइव्ह दाखवले जाते.
मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केल्यामुळं कंपनीने मंगळवारी ते रद्द केले. संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनलने कंपनीच्या कोणत्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केलं, हे मात्र सांगण्यात आलं नाही. आता संसद टीव्हीवरून विधान आल्यानंतर स्पष्ट झालं की ते हॅक करण्यात आलंय.
Sansad TV चं नाव बदलून Ethereum असं करण्यात आलं. इथरियम ही एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. चॅनल नंतर सोशल मीडिया टीमने परत मिळवले. हे वृत्त लिहिपर्यंत संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल पूर्ववत झाले नव्हते.
खाते हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पंतप्रधानांचे ट्विटरवर खाते हॅक करून क्रिप्टोकरन्सीबाबत पोस्ट करण्यात आली होती. नंतर खाते रिकवर केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
