मडगावात पोर्तुगीजकालीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचा एक भाग कोसळला

मडगाव, गोवा ८ जुलै २०२३: मडगावात सर्वात जून्या आणि पोर्तुगीजकालीन इमारतीपैकी एक असलेल्या, आरोग्य केंद्राच्या पुरातन इमारतीपैकी एक भाग आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. पावसामुळे सदर इमारत कमकुवत झाली होती. हा प्रकार दिवसा घडला असता, तर शेकडो जणांचा बळी गेला असता.

पोर्तूगीज कालीन ही इमारत मडगावातील सर्वात जुन्या इमारतीपैकी एक आहे. गेले आठवडाभर पावसाने झोडपून काढले असताना ही घटना घडली. जुनी झाल्याने आधीच कमकुवत बनलेल्या या इमारतीची डागडुजी करण्यात आली नव्हती. रात्री पावसाच्या तडाख्यात इमारतीच्या वरचा भाग कोसळून पडला. या दुर्घटनेटत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, एक दुचाकी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे.

जुन्या हॉस्पिसीयो इस्पितळासमोर असलेल्या या इमारतीत दर दिवशी शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थिती लावतात. हा प्रकार दिवसा घडला असता तर लोकांसह आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा बळी गेला असता अशी भीती मडगावचे नागरिक विवेक नाईक यांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा