घोटाळ्यात नाव आल्यानंतर पार्थ चॅटर्जी यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी, ममता बॅनर्जींची कारवाई

कोलकत्ता, २८ जुलै २०२२: ममता सरकारने पार्थ चॅटर्जीवर कारवाई केली आहे. पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. शिक्षणमंत्री असताना या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

बंगालच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार पार्थ चॅटर्जी यांना उद्योगमंत्री पदासोबतच इतर पदांवरूनही हटवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण विभाग, संसदीय कामकाज इत्यादी विभागातूनही कार्यमुक्त करण्यात आले आहे.

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. अर्पिता मुखर्जीला पकडल्यानंतर पार्थ यांना अटक करण्यात आली. अर्पिताच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सुमारे २० कोटी रुपयांची रोकड सापडली.

यानंतर बुधवारी अर्पिताच्या दुसऱ्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यातही सुमारे २० कोटी रुपयांची रोकड सापडली. यासोबतच तेथून अनेक किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात लाच म्हणून घेतलेला हाच पैसा असल्याचे ईडीचे मत आहे.

गेल्या वेळी २१ कोटी ९० लाख मिळाले होते, तर यावेळी (बुधवारी) ईडीकडे २७ कोटी ९० लाख रोख आणि ४ कोटींहून अधिक किमतीचे सोने मिळाले आहे. काल २१ जुलै रोजी ईडीने डायमंड सिटी फ्लॅटवर छापा टाकला होता, तर बेलघोरियाच्या फ्लॅटमध्ये छापेमारी करताना काळ्या पैशाचा खजिना सापडला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा