मुंबई, ३ मार्च २०२१: मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून अटक केली होती. या गुन्ह्यात अनेक जण आरोपी आहेत. या गुन्ह्यात सुरुवातीला बार्कचे अधिकारी तक्रारदार होते. त्यानंतर त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांना ही अटक होऊ लागली. अशाच प्रकारे बार्कचे सर्वेसर्वा पार्थोदास गुप्ता याला २४ डिसेंबर २०२० रोजी अटक झाली होती. या टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी पार्थोदास गुप्ता याला काल अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने पार्थोदास गुप्ता याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आला. पार्थोदास गुप्ता हा गेल्या ६६ दिवसांपासून जेलमध्ये होता. या गुन्ह्यात महत्त्वाचा रोल असल्याने त्याला अटक झाली होती. मात्र अखेल काल त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे.
रिपब्लिक टीव्ही टीआरपी वाढवण्यासाठी पार्थोदास गुप्ता याने पैसे घेतले होते. याप्रकरणी अर्णव गोस्वामी आणि पार्थोदास गुप्ता यांची व्हाट्सअप चॅट देखील लीक झाली होती. पार्थो दासगुप्ता टीआरपी (टेलीविजन रेटिंग प्वाईंट्स) प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. पार्थो दासगुप्ता २०१३ ते २०१९ या काळात बार्क चा सीईओ होता. रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या टीआरपी वाढवण्यासाठी पार्थोने त्या चॅनेलकडून वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवला होता. त्याच्याकडून पैसे ही घेतले होते. यामुळे पार्थोला अटक झाली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे