सुशांत प्रकरणावर पार्थ यांचे ट्विट… काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मुंबई, १९ ऑगस्ट २०२०: काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी सुशांत सिंग प्रकरणाविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यात त्यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. परंतू काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबई पोलिसांची बाजू घेत सीबीआय चौकशी विषयी कोणतेही विधान केलं नव्हतं. पार्थ पवार यांच्या विधानावर शरद पवार यांनी त्यांचे हे विधान मनावर घेऊ नका ते नासमज आहेत असं वक्तव्य केलं होतं. यात आज पार पवार यांनी आणखीन एक विधान केले आहे.

आज सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट करत आपले मत व्यक्त केलं आहे. यामुळे आता पार्थ पवार विरुद्ध शरद पवार असं चित्र उभं राहतं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, या दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पार्थ पवार यांच्या या विधानावर आपलं मत व्यक्त केलं आहे. पार्थ पवार यांनी काय ट्वीट केले, ते मला माहित नाही. पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती हे खरंच आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला कमेंट करायची नाही. पण त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केलं असावं” असं फडणवीस म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे” असेही फडणवीस म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा