पश्चिम बंगालमध्ये पक्षांतर सुरूच, भाजपाचे ३५० कार्यकर्ते गंगाजल शिंपडत टीएमसीमध्ये दाखल

बीरभूम, १९ जून २०२१: पश्चिम बंगालमध्ये बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आता तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) मध्ये परतत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीमध्ये मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते पुन्हा प्रवेश घेण्याच्या विचारात आहेत. टीएमसीमध्ये जाण्यासाठी गंगाजल शिंपडून भाजपा कार्यकर्त्यांचं शुद्धीकरण केलं जातंय.

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात भाजपच्या ३५० कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं. सर्व कार्यकर्ते म्हणाले की त्यांनी भाजपमध्ये जाऊन चूक केली. आता त्यांना पुन्हा टीएमसीमध्ये घ्यावं. भाजप कार्यकर्त्यांचं हे धरणे ४ तास चाललं.

अजब गोष्ट म्हणजे चार तास चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर तेथील टीएमसी पंचायत प्रमुखांनी गंगाजल सर्व कार्यकर्त्यांवर शिंपडलं, त्यांना शुद्ध केलं, त्यानंतर त्यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं. यासाठी भाजप कार्यकर्तेही उत्सुक होते. केवळ छोट्या कार्यकर्त्यांबद्दलच नव्हे, तर पक्षाच्या पराभवानंतर दिग्गज भाजप नेतेही या पंक्तीत दिसले.

सामील करूस्तोवर आंदोलन

सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं की, पुन्हा टीएमसीमध्ये समाविष्ट होईपर्यंत हे धरणे आणि उपोषण संपणार नाही. प्रत्येकाच्या हातात एक फलक देण्यात आलं होतं, ज्यावर भाजपमध्ये प्रवेश करणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं आणि टीएमसी आणि ममता बॅनर्जी उत्कृष्ट असल्याचं म्हटलं जात होतं.

काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते टीएमसीमध्ये जाण्याचा आग्रह करत बीरभूममधील टीएमसी कार्यालयाबाहेर धरणेवर बसले होते. हा नवीन ट्रेंड सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे, बंगाल मध्ये टीएमसीकडं परत जाण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपोषणं करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा