नागपूर, २४ फेब्रुवारी २०२४ : आपने इंडिया आघाडी मध्ये जागा वाटपाची चर्चा यशस्वीपणे पूर्ण केल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआय व इडी मार्फत अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महाषडयंत्र तयार केले असल्याचे सुत्राकडून माहीती मिळाल्याची बाब आम आदमी पार्टीकडून एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आली.
संपूर्ण देश गेल्या दोन दिवसांपासून, उत्सुकतेत आहे की आप ही इंडिया आघाडीची चर्चा यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचवत आहे. जवळ-जवळ सर्व राज्यांमध्ये जागा वाटपाची संबंधित संपूर्ण प्रक्रिया लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट नसताना भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पण जागा वाटपाच्या निष्कर्षापर्यंत इंडिया आघाडी आप ने पोहचवली ही बातमी येताच भाजपमध्ये धक्कादायक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता भाजप आघाडी तोडण्यासाठी महाषडयंत्र आखत आहे आणि यातून आम आदमी पार्टीचे खच्चीकरण करून देशाची आशा असेलली आम आदमी पार्टी तिला कसे थांबवता येईल? असे अनेक षडयंत्र आखून प्रयत्न सुरु आहे.
कालपासून ‘आप’ च्या वरिष्ठ नेत्यांना भाजपाच्या लोकांकडून मॅसेज मिळत आहेत की, ‘आप’ ने इंडिया आघाडी सोडली नाही तर मोदीजी सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करतील अशी सरळ सरळ धमकी देणे सुरु आहे. संपूर्ण देशाला माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मोदीजींनी खोट्या बनावट दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला अरविंद केजरीवाल यांना गुंतवण्यासाठी धारेवर धरले आहे.
गेल्या दोन वर्षात १००० हून अधिक छापे टाकण्यात आले, ईडीने ७ समन्स पाठवले. सीबीआयने अनेक नोटीस पाठवल्या, अरविंदजीची सीबीआयने ९ तास चौकशी केली, पण सीबीआय आणि ईडी दोघेही करू शकले नाहीत. एक पैसा किंवा ठोस पुरावा शोधले नाही. अनेक अधिकाऱ्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काहीही करा आणि केजरीवाल यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवा असे आदेश गेले आहेत. पण आता इंडिया आघाडीची चर्चा पूर्ण होत असताना मोदीजींना २०२४ च्या लोकसभा निवडणुका हरण्याची भीती वाटते. आता असे समजण्यास वावगं नाही आहे की लवकरच १ किंवा २ दिवसांत सीबीआय किंवा ईडी नोटीस जारी करणार आहे आणि त्यानंतर लवकरच, आणखी १ किंवा २ दिवसांत सीबीआय आणि ईडी दोघेही अरविंदजी यांना अटक करतील. असे आदेश सीबीआय व ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आले आहेत.
आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना असे धमकवण्यात येत आहे की, जर आपने इंडिया आघाडी सोडली तर सीबीआय नोटीस पाठवणार नाही किंवा ईडी अरविंदजी यांना अटक करणार नाही, पण ‘आप’ हा मोदीजी किंवा त्यांच्या कोणत्याही एजन्सीला घाबरणारी पार्टी नाही मग ती सीबीआय किंवा ईडी असो. ‘आप’ देशातील जनतेसाठी लढत राहील. कितीही बलिदान द्यावे लागले तरी देश हितासाठी आम आदमी पार्टी ही इंडिया आघाडीचा भाग राहील व देशातील जी भीषण स्थिती आहे. त्यातून देशाला वाचवेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य संघटन सचिव आम आदमी पार्टीचे भूषण ढाकूळकर यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे