नवी दिल्ली, २५ जुलै २०२३ : भारतीय रेल्वेची बुकिंग करण्यात येणारी वेबसाईट काही तांत्रिक बिघाड झाल्याने बंद आहे. त्यामुळे गेल्या दहा तासांपासून रेल्वेची तिकिट बुकिंगची सेवा बंद आहे. दरम्यान रेल्वेची टेक्निकल टीम या समस्येचे निराकरण करत असल्याचे रेल्वे माहिती प्रणाली केंद्राकडून सांगण्यात आले आहे. या टेक्निकल समस्येची पुष्टी रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅडेलवरुन करण्यात आले आहे.
सध्या इंडियन रेल्वे वेबसाईटवर, तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची तिकिट सेवा तात्पुरती उपलब्ध नाही. तसेच आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करत असून, तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही सूचित करु, असे देखील आयआरसीटीसीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
रेल्वे तिकीट बुकसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. आँनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात. असे देखील आयआरसीटीसीने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर