प्लास्टिकच्या बाटल्या न वापरण्यामागची वैद्यकीय कारणे

मुंबई : प्लास्टिक बंदी झाली तरी प्लास्टिकच्या बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वापरल्या जातात. बाटलीबंद पाण्यासाठी जे प्लास्टिक वापरले जाते त्याला ‘पॉलीथिलीन टीरेफेथालेट’ (PET) म्हणतात. या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये DEHA नसते. एकंदरीत बाटलीबंद पाण्यामुळे कोणालाही कॅन्सर होणार नाही.
एक लक्षात घ्या, बिसलेरीसारख्या पाण्याच्या बाटल्या पुन्हा वापरण्यासाठी बनलेल्या नसतात. त्यामुळे पुन्हापुन्हा वापरून त्यांची झीज होते.
गुळगुळीत झालेल्या आणि त्यांच्यावर पिवळसर डाग आलेल्या बाटल्या तुम्ही पाहिल्याही असतील. अशा बाटल्या मग बॅक्टेरियांच्या वाढीसाठी आणि राहण्यासाठी उत्तम घर बनतात. पिण्याच्या पाण्यातून होणारे रोग टाळण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या न वापरण्याचा सल्ला तज्ञ् देतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा