मुंबई, 8 जून 2022: राज्यसभा निवडणूक १० जूनला होणार आहे. ४ राज्य १६ जागा यांच्यातल्या सामना १० जूनला रंगणार आहे. मात्र त्याचा निकाल १३ जूनला लागणार आहे . १६ जागांसाठी सुरु असलेला हा सामना अटीतटींचा होणार हे सध्याचं चित्र आहे. मविआ विरुद्ध भाजप या सामन्यांत कोणाचे पारडे भारी हे समजत नाही.
मविआ तर्फे संजय पवार तर भाजप तर्फे धनंजय महाडिक समोरासमोर उभे राहिले आहेत. सूत्रांनुसार अपक्ष उमेदवारांना स्वत:कडे खेचण्यात मुख्यमंत्र्यांना काही अंशी यश मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मविआचीच सत्ता असणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जाहीर रित्या दर्शवला आहे.
भाजप मात्र सध्या कुठलाही दावा करत नाही. ही त्याची रणनीती आहे की कुठेतरी मनात हारण्याची भीती आहे, याचा थांगपत्ता लागत नाही.
फडवीसांना कोरोनाची लागण होऊन प्रचारात खंड पडल्याने, नक्की भाजपची मदार कोणाच्या खांद्यावर आहे, हे समजत नाही.
भाजपने सगळ्यांना हॅाटेलमध्ये एकत्र ठेवले. तर मविआ ने सर्वांना ट्रायडंट हॅाटेलमध्ये ठेवले. पक्षातील आमदारांची होणारी फोडाफोडी टाळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे.
एमआयम कुणाला पाठिंबा देणार तर अपक्ष कुणाला साथ देणार, यावर हे पारडे वर खाली होऊ शकते.
पण आता केवळ १३ जूनपर्यंत निकालाचा वाट पहाणे , हेच प्रत्येकाच्या हातात आहे. हे मात्र खरं
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

