पाटण तालुक्‍यात शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.४ जून २०२० : पाटण तालुक्‍यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन महिने कसलाही करोनाचा संसर्ग पाटण तालुक्‍यात नसताना लॉकडाऊनच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यात तालुक्‍यात करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. तालुक्‍यातील शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाटण तालुक्‍यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्‍यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तहसील कार्यालय येथे तातडीची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते .

या बैठकीस उपस्थिती पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांसह आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा