‘कोरोनिल’ औषधाचा दावा पतंजलीच्या अंगलट, १० लाखांचा दंड……

मद्रास, ८ ऑगस्ट २०२०: कोरोना व्हायरसवर ‘कोरोनिल’ परिणामकारक औषध असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडून करण्यात आला होता. मात्र या ‘कोरोनिल’ औषधाचा दावा पतंजलीच्या चांगलाच अंगलट आला आहे. या औषधावरून मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले आहे. तसेच न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

काय आहे नेमके प्रकरण…..

चेन्नईमधील मे. अरूद्र इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीने आपल्या ट्रेडमार्कचा भंग केल्याप्रकरणी पतंजली विरोधात न्यायालयात दावा केला होता. यावर निर्णय देत अखेरीस न्यायालयाने पतंजलीला १० लाखांचा दंड ठोठावला आहे. ‘कोरोनिल २१३’ एसपीएल आणि ‘कोरोनिल ९२’ बी हे आमचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. गेली ३० वर्षे या नावानं आपण औद्योगिक सफाई रसायने विकत आहोत, असा या कंपनीने दावा केला होता. औषधावरील मनाई हुकूम उठविण्यासाठी पतंजलीने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मद्रास कोर्टाने पुढे काय म्हटले…..

बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली ही लोकांच्या मनातील भीतीचा फायदा घेत हे औषध बाजारात आणले आहे. त्यामुळे लोकांना हे औषध कोरोनावरील औषध असल्याचे वाटतेय. खरं तर हे औषध फक्त ताप, सर्दी, खोकला यावरचे आहे. असे न्यायालयाने सांगत पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नईतील अद्यार इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पतंजली विरोधात याचिका दाखल केली आहे. या कंपनीचा कोरोनील या नावाने ट्रेडमार्क २०२७ सालापर्यंतसाठी रजिस्टर आहे. पतंजलीने या नावाने औषध बाजारात आणताना ते नाव रजिस्टर आहे की नाही हे तपासणे गरजेचे होते असे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने पतंजलीला कोरोनील हे नाव न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

सोबतच पतंजलीने अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंट योग अॅण्ड मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ला पाच पाच लाख रुपये प्रत्येक देण्याचे आदेश न्यायालयाने पतंजलीला दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा