पाथर्डी तालुक्यात तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

पाथर्डी, दि.२८मे ,२०२०: पाथर्डी तालुक्यात तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्यासाठी करंजी तालुक्यात शेतकऱ्यांची एकच झुंबड उडाली असल्याचे पहायला मिळत आहे. करंजी घाटाच्या पायथ्याशी घोरदरा पाझर तलाव आहे. तलावांमधील गाळ काढण्यासाठी करंजी ग्रामपंचायतने शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे.

शेतकरी हा गाळ काढुन आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे. तलावामध्ये असलेली माती, गाळ ही शेतात टाकून आपली शेती सुपीक करण्याचे प्रयत्न सुरू केला आहे.
तलावांमध्ये जास्तीत जास्त पाणी साठा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना गाळ उपसण्यासाठी परवानगी दिली आहे .

तीन हजार ब्रास गाळ उपासला जाणार आहे.
मागील काही वर्षे शेतकऱ्यांना हा गाळ काढण्यासाठी कृषी विभागाकडून अर्थसहाय्य दिले जात होते. यावर्षी शासनाचा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे गतवर्षी गाळ उपसताना कुठलाही निधी उपलब्ध झालेला नाही.
– प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी, पाथर्डी

तलावात जास्तीत जास्त पाणीसाठा व्हावा , म्हणुन तलावातील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायत परवानगी देत आहे.
– बाळासाहेब अकोलकर, सरपंच करंजी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा