गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पथकर माफ

मुंबई, १४ ऑगस्ट २०२० : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पथकर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस, पथकारातून सूट मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात वाहन क्रमांक, वाहन मालकाचं नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यावर त्यांना तात्काळ पथकर माफीचे स्टिकर मिळेल. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असं आवाहान शिंदे यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी, राज्य सरकारच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा