शिर्डी : पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असून जन्मस्थानाचा हा लढा अखेरपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जन्मस्थानाबाबतचा ठराव दोन्ही हात उंचावून मंगळवारी (दि.२१) झालेल्या ग्रामसभेतून पारित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी शिर्डीवासीयांना चर्चेला ज्या प्रमाणे बोलावले, त्याप्रमाणे आम्हालाही बोलवा, अशी मागणी करत यासाठी शासनाने समिती गठीत करावी, असा ठराव ग्रामसभेत केला.
सर्वपक्षीय नेते मंडळींच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली.
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागातून साईभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
यावेळी खा.संजय जाधव, मंदिराचे विश्वस्थ तथा आ. बाबाजानी दुर्राणी, आ. सुरेश वरपुडकर, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. मोहन फड, माजी आ. माणिकराव आंबेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, संस्थानचे अध्यक्ष सिताराम धानू, विश्वस्थ अतूल चौधरी, संजय भूसारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.