रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यात रुग्णाचा रस्त्यावरच मृत्यू

पुणे दि.१६ मे २०२०: पुण्यात तीन तासांहून अधिक तास रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे कंटेन्मेंट झोन मध्ये असलेल्या नाना पेठेत एका रहिवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आपल्या घरातील व्यक्तीचा मृत्यू आपल्याच डोळ्यांनी पाहण्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला.

यशूदास मोती फ्रान्सिस (वय ५४) असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. फ्रान्सिस हे नाना पेठेतील रहिवासी असून त्यांचा रस्त्यावर खुर्चीतील मृतदेहाचा तसेच त्यांची पत्नी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ शुक्रवारी (दि.१५) रोजी रात्री उशिरा व्हायरल झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली.

या घटनेत पोलीस आणि स्थानिक नागरिक कोणीही मदतीला आले नाही, असा आरोप फ्रान्सिस यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाना पेठेत राहणारे फ्रान्सिस यांना रात्री एकच्या सुमारास अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न केले. दीड वाजता डुल्या मारुती चौकात फ्रान्सिस यांना आणले. नाते वाईकांनी वाहनांची शोधाशोध केली परंतू वाहन न मिळाल्याने त्यांनी १०० आणि १०८ क्रमांकावर फोन केले. तरीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा