सिध्दटेक पुल बंद असल्याने रुग्णांचे होत आहेत हाल

2

कर्जत, ७ मे २०२०: कोरोनामुळे पुणे जिल्हा अतिघातक विभाग बनला आहे. पुणे जिल्ह्यातील महत्वाचा तालुका, प्रति पुणे म्हणून दौंड शहराकडे पाहीले जाते. रेल्वेचे सर्वात मोठे जाळे आणि मोठया केमिकल कंपन्या, औद्योगिक कंपन्या या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत.

आठवडाभर अगोदर एसआरपीचे जवान कोरोना पॉझिटीव्ह सापडले. त्यामुळे संपुर्ण दौंड तालुक्यात ताळेबंदी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.

दौंड तालुक्याला जोडणारा दुवा म्हणजे सिध्दटेकचा पुल होय. भीमा नदीमुळे अहमदनगर व पुणे हे जिल्हे विलग होतात. हा पूल बंद केल्यामुळे ज्यांचे उपचार दौंडच्या डाॅक्टरांकडे चालू आहेत त्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. सिध्दटेकचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संदिप मोरे यांनी ही माहिती दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा