मुंबई, , दि. २ जून २०२०: कोविड -१९ साथीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून येतो. पण त्यादरम्यान चक्रीवादळ “निसर्गा” ने महाराष्ट्राला आणखी एक आपत्ती दिली आहे. हे चक्रीवादळ उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे. चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक किनारपट्टीवर एन डी आर एफ च्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आज दुपारी चार वाजेपर्यंत या संदर्भात प्राथमिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या रुग्णांना हलविण्यात आले आहे. मुंबईतील बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पासून रुग्णांना वरळी येथे हलविण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे रुग्णांना कोणताही धोका होऊ नये, कोणताही त्रास होऊ नये यासाठी आधीच प्रशासनाने ही तयारी केलेली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जवळपास शंभर रूग्ण येथे अाहेत . जी माहिती मिळते त्यानुसार ६० जणांना आधी हलवण्यात आलेले आहे. आज दुपारी तीन वाजता उर्वरित रुग्णांना हलवण्यात येणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पहाटेच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होण्यास सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे हे चक्रीवादळ उद्या कोकण किनारपट्टीला येऊन धडकणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी