बाहेरून आलेल्या लोकांमुळे रूग्ण वाढले : पालकमंत्री अमित देशमुख

लातूर,दि.२० मे २०२०: लातूर जिल्ह्यात बाहेरून येत असलेल्या लोकांमुळे रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले. ६१ रूग्णांपैकी आंध्रप्रदेशचे ८ आणि उदगीर येथे काही रूग्ण आढळले. जिल्ह्यात विदेशातून १२५ लोक आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लातूरमध्ये अत्याधुनिक लॅब झाल्याने एका दिवसात १६० नमुने तपासले जातात. तसेच लॉकडाऊन काळात २२ लाख ७६ हजार ८०० लोकांना रेशन देण्यात आले. केशरी कार्डधारकांनाही धान्य देण्यात आले. ग्रामीण भागात आलेल्या १७ हजार ५६६ मजुरांना काम मिळावे म्हणून रोहयोने अंतर्गत ३ कोटी ३२ लाख रूपयांची तरतूद केली. जिल्ह्यात ४३१ लोकांना घरात अलगीकरण केले आहे.

४१२ लोकांना संस्थात्मक अलगीकरण तर ७७८ रूग्णांना आयसोलेशन केले आहे. लातुरात लॅब झाल्याने चार, सहा, आठ तासांत तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत. ३० लोक बरे होऊन घरी गेले. निलंगा येथे मंगळवारी( दि.१९) रोजी आढळलेले सहा रूग्ण निलंगा तालुक्यातील कोराळी येथील आहेत. ते मुंबईहून आले आहेत. उपचार घेणारे २९ रूग्ण आहेत. त्यात १३ महिला, १६ पुरूषांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ६१ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. प्रत्येकाने काळजी घेतल्यास कोरोनाला हद्दपार करू शकतो,असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा