तपासणीसाठी कोरोना चाचणीच्या रूग्णांची होतेय फसवणूक

उरूळी कांचन, दि. २१ जून २०२० : कोरोनाच्या रुग्णांना खासगी रुग्णालयातही मोफत उपचार मिळावे यासाठी अनेक रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर उभारले आहेत. पण शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाला माऊली लाड यांनी वाचा फोडली आहे.

माऊली लाड म्हणाले, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व-सामान्य गरीब जनतेला कोरोना चाचणी करता यावी म्हणून साडेचार हजार रुपयांची कोरोनाची चाचणी अडीच हजार रुपयांत केली पण काही रूग्णालयात कोरोना चाचणीसाठी अजूनही जादा पैसे घेतले जातात.

याबाबत ते पुढे म्हणाले, एका रुग्णालयात कोरोनासाठी साडेचार हजार रुपये घेतले असून कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असताना त्या गरीब रूग्णाचे १९ हजार रूपये नाहक गेले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष – भगवानराव वैराट यांच्याशी चर्चा करुन रुग्णालयावर खटला दाखल करणार असल्याचे लाड यांनी ‘न्यूज अनकट’ शी बोलताना सांगितले.

रूग्ण जरी दुसर्‍या आजारासाठी रूग्णालयात जात असतील तरी कोरोनाची चाचणी केली जाते. हे योग्य असले तरी शासनाच्या नियमानुसार पैसे घेणे गरजेचे असताना सुद्धा जास्त पैसे का घेतले जातात हे मात्र अस्पष्टच आहे. याबाबत लवकरच शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे याचा पाठपुरावा करण्यात येणार असून गरीब व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला जाईल असे माऊली यांनी सांगितले.

गरीब जनतेची पिळवणूक रूग्णालयांनी थांबवावी अन्यथा लॉकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल मोठे आंदोलन उभे करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा