कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुढील तीन महिने गंभीर आजार होण्याचा धोका

पुणे, १३ नोव्हेंबर २०२० :कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुढील तीन महिने गंभीर आजार होण्याचा धोका असतो. अशा आजारांबाबत लक्षणं दिसल्यास या रुग्णांवर तातडीनं उपचार करता यावे, यासाठी पुणे महापालिकेतर्फे जंबो कोविड हॉस्पिटलसह तीन ठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. लोक मात्र या पोस्ट कोविड उपचारांबाबत फारसे गंभीर नाहित असं दिसतं आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर काही काळापर्यंत अंगदुखी, थकवा, नैराश्य, पक्षाघात, त्वचेवर पुरळ, हृदय विकाराचा झटका असे आजार होऊ शकतात. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब तसंच इतर गंभीर आजार असलेल्यांना अधिक धोका असतो. सध्या कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक असली, तरी त्यानंतर त्रास होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत असून अनेकांना गंभीर आजार झाले आहेत.

लोक घरी सोडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचं नियमित सेवन करत नाहीत.आहार, व्यायामाकडे दुर्लक्ष करतात, घरी सोडल्यानंतर प्रत्येक दोन आठवड्यांनी रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करून घेण्याचं टाळतात. असं आढळून आलं आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यातल्या पोस्ट कोविड ओपीडींनाही अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळेच कोरोना मुक्त रुग्णांनी पोस्ट कोविंड उपचारांकडे दुर्लक्ष करू नये.

खाजगी रुग्णालयात महागडे असलेले हे उपचार महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन आता महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा