पत्नी आणि माहेरच्या लोकांना कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांकडून सातत्याने होणारा अपमान व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसरयेथील ससाणेनगर परिसरात २३ डिसेंबर २०१९ रोजी घडली. याबाबत उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश बापू गायकवाड (वय २२, रा. साडे, करमाळा, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ज्योती गायकवाड (वय ५०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची पत्नी, सासरे, मेव्हणा व मेहुणी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. तो त्याच्या पत्नीसह ससाणेनगर येथे राहत होता. दरम्यान, सतीशची पत्नी, सासरे, मेव्हणा-मेहुणी हे त्याचा सातत्याने अपमान करीत होते. तसेच त्याला मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्याने २३ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

: पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांकडून सातत्याने होणारा अपमान व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसरयेथील ससाणेनगर परिसरात २३ डिसेंबर २०१९ रोजी घडली. याबाबत उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश बापू गायकवाड (वय २२, रा. साडे, करमाळा, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ज्योती गायकवाड (वय ५०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची पत्नी, सासरे, मेव्हणा व मेहुणी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. तो त्याच्या पत्नीसह ससाणेनगर येथे राहत होता. दरम्यान, सतीशची पत्नी, सासरे, मेव्हणा-मेहुणी हे त्याचा सातत्याने अपमान करीत होते. तसेच त्याला मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्याने २३ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा