पत्रकार चौकात अपघात; युवकाचा मृत्यू

अहमदनगर : मनमाड महामार्गावर नगरमधील पत्रकार चौकात भीषण अपघातात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) दुपारी साडेबारा वाजता घडली.

कमलेश अनिल पटवा (वय ३०, रा.भुतकर वाडी, नगर) असे अपघातात मृत झालेल्याचे नाव समजते आहे. दुधाने भरलेला टँकर नगरकडून मनमाडकडे चाललेला असताना यावेळी दुचाकीवरून आलेला युवकाला टँकरची धडक झाली. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान पत्रकार चौकातील वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये ही घटना कैद झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा