गोल पोस्ट गोल पोस्ट कवर स्टोरी पत्रकार दिन विशेष…

पत्रकार दिन विशेष…

पत्रकारिता आणि तिचे बदलते स्वरूप

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ६जानेवारी हा महाराष्ट्र सरकारने पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

वृत्तपत्राची संकल्पना ही त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळत नव्हते. मात्र, ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला.

ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम असायचे. त्या काळात मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे “दर्पण” हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. ८३२ मध्ये सुरू झालेले “दर्पण” हे वृत्तपत्र ८४० पर्यंत चालले.

गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. ६ जानेवारी  १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. त्यामुळे इंग्रजी प्रशासनाला देखील याची जरब बसली होती. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या “केसरी” या वृत्त पत्रानेही एक काळ गाजवला. मराठा, दर्पण अशी अनेक वृत्तपत्रे इंग्रजी राजवटीला हलवण्यास समर्थपणे उभी राहिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्र हा एक महत्वाचा घटक मानला जात असे.
जसा काळ बदलला तशी वृत्तपत्रांची संख्या वाढत गेली. त्या पध्द्तीने लिखाण होत गेलं. प्रसिद्धीच्या अनेक गोष्टी निर्माण झाल्या. त्यामुळे विसाव्या शतकात वृत्तपत्रांचे महत्व अजूनही अबाधित आहे. ते कमी झालेले नाही. त्याच आवडीने ते वाचले जाते. फरक फक्त एवढंच आहे की, वृत्तपत्र आता एक विशिष्ट वर्गच वाचताना दिसतो आहे.
जागतिक पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” काढून पत्रकारितेला एक नाव दिले. त्यामुळे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. आजच्या दिवसाच्या पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा…!

error: Content is protected !!
Exit mobile version