मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सर्व घडामोडींचे स्पष्टीकरण दिले आहे. पवार म्हटले आहेत की, “अजित पवारांनी केलेल्या कृत्य विषयी त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनाही याची पूर्व कल्पना नव्हती.” त्यानंतर ते पुढे म्हणाले की, ” अजित पवार आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार यांनी पक्षांतर कायदा विसरू नये. पक्षांतर कायद्याअंतर्गत त्यांची सदस्यता निलंबित केली जाऊ शकते.”
यावर ते असेही म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला माझा पाठिंबा नाही. आज संध्याकाळी चारच्या सुमारास पुन्हा काँग्रेसची बैठक होणार आहे या बैठकीत यावर पुन्हा चर्चा केली जाईल.”
राष्ट्रवादीचे आमदार संदीप शिरसागर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्हाला राज भावनांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. अजित पवार हे आमचे नेते आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन केले व राज भावनांमध्ये उपस्थित राहिलो, परंतु आम्हाला याची कोणतीही कल्पना नव्हती अजित पवार हे शपथविधीसाठी आले आहेत. काही क्षणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट केले की आम्ही शरद पवारांची निष्ठा सोडणार नाही व आम्ही त्यांच्यासोबतच आहोत.”
पवारांनी स्पष्टीकरण देताना असे सांगितले की, पक्षांतर्गत काम करण्यासाठी ज्या सह्या घेण्यात आल्या होत्या यामध्ये ५४ आमदाराच्या सह्या होत्या बहुतेक या सह्या अजित पवारांनी राज्यपालांकडे आमदाराची संमती म्हणून दिल्या असाव्यात. येथे राज्यपालांना याची कल्पना नसल्यामुळे त्यांनी शपथविधी पूर्ण केला असावा. यावरून असे समजते की अजित पवार यांनी सह्यांचा गैरवापर केला आहे.
उद्धव ठाकरे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जनतेने तो जनादेश दिला होता त्याचा अपमान अजित पवार यांनी केला आहे.