पत्रकार संघाच्या अध्यक्षाला एसटीबस वाहकाची अपमानास्पद वागणूक

शिरुर : नव्याने स्थलांतरीत झालेल्या पुणे येथील (वाकडेवाडी) बस स्थानकात शिरुर बसचे वाहक शिवाजी केदार यांनी शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय बारहाते यांना अपमानास्पद वागणुक देऊ न अरेरावी केल्याबद्दल केदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिरुर तालुका मराठी पत्रकार संघ व महाराष्ट राज्य पत्रकार संघाने शिरुरचे आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यांच्याकडे एका निवेदनादवारे केली आहे.
दरम्यान आगारव्यवस्थाक माघाडे यांनी दोनच दिवसांत कारवाई करु असे आश्वासन दिले आहे.
शनिवार दि. ११ जानेवारी रोजी शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय बारहाते कामानिमित्त पुण्यावरुन शिरुरला येण्यासाठी वाकडेवाडी येथे नव्याने स्थलांतरीत झालेल्या डेपोत शिरुर बसची वाट पाहात थांबले होते. इतक्या एका वाहकांभोवती काही नागरीक गोळा होऊ न बसची विचारणा करीत असताना सदर वाहक सर्वांना धमकावत व अरेरावी करीत असल्याचे बारहाते यांच्या निर्दशनास आले. ही बाब लक्षात येताच बारहाते यांनी संबंधीत वाहक केदार यांना बस शिरुरसाठी केव्हा निघणार आहे असे विचारताच ते वाहक बारहाते यांच्यावरही प्रचंड भडकले ? मला विचारणारे आपण कोण ? त्यावेळी बारहाते यांनी मी प्रवासी आहे मला शिरुरला जायचे आहे म्हणून विचार केली असे बोलल्यावर सदर वाहक अंगावर धावून येत होते तेंव्हा मात्र बारहाते यांनी ते स्वत: पत्रकार असल्याचे सांगितले.
पत्रकार म्हणून सांगितल्यानंत तर ते आणखीनच भडकले आणि संपूर्ण पत्रकारांबाबत अपशब्द वापरुन अत्यंत हिनतेची वागणुक दिली. त्यावेळी त्या स्थानकात उभ्या असलेल्या इतर कर्मचार्‍यांनीही केदार यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही केदार यांनी सुनावले, एकुणच प्रवाशांशी अत्यंत उध्दटपणे वागणार्‍या आणि पत्रकार बारहाते यांना अपमानास्पद वागणुक देणार्‍या केदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
याच मागणीसाठी शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय बारहाते, संस्थापक नितीन बारवकर, माजी तालुकाध्यक्ष मुकुंद ढोबळे, निघोज-टाकळीहाजी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय उणवणे, पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मदन काळे, तालुका समन्वयक पोपट पाचंगे, पत्रकार प्रविण गायकवाड , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे तसेच इतर असंख्य पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
केदार यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी सर्व पत्रकारांनी केली असता दोन दिवसांत केदार यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यांनी दिले.
ही कारवाई न झाल्यास शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.

चौकट
शिरुर आगारातील वाहकांच्या विरोधात अशा प्रकारच्या तक्रारी होण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, याचाच एक भाग म्हणून शिरुरमधील एका मुकबधीर असलेल्या प्रवाशाने एस.टी. वाहकांच्या याचं मनमानीला कंटाळून अक्षरश: आपल्या मोबाईलच्या वॉटस्अ‍ॅप स्टेटला एक भावनिक पोस्ट ठेवली आहे, ज्यातून त्याने एस.टी.वाहकाकडून होणार्‍या पिळवणुकीबाबत आवाज उठवला आहे. एका बाजूला राज्य परिवहन मंडळाचा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरु असताना दुसर्‍या बाजूला वाहकाकडूनच अशी वागणुक मिळणे खेदजनक आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा