पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉक होम, १३ ऑक्टोंबर २०२०: यावेळी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांनी जिंकले आहेत. लिलाव सिद्धांतातील सुधारणांकरिता आणि नवीन लिलाव स्वरूपाच्या शोधासाठी मिलग्रोम आणि विल्सन यांना हे नोबेल पारितोषिक प्राप्त झालंय. यापूर्वी सन २०१९ मध्ये हा पुरस्कार एमआयटीमधील दोन आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या एका संशोधकांना देण्यात आला होता. या पुरस्कारप्राप्त व्यक्तीला एक कोटी क्रोना म्हणजेच अंदाजे ११ लाख अमेरिकन डॉलर्स दिले जातात.

स्वीरिजेज रिक्सबँक प्राइज इन इकोनॉमिक सायन्स इन मेमोरी ऑफ अल्फ्रेड नोबेल या नावानंही हा पुरस्कार ओळखला जातो. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘त्यांनी अशा वस्तू व सेवांच्या लिलावासाठी नवीन लिलाव स्वरूप तयार करण्यासाठी आपली दूरदृष्टीचा वापरली आहे ज्यांना पारंपरिक पद्धतीनं विकणं कठीण जात होतं, जसं की रेडिओ फ्रिक्वेन्सी.’

नोबेल पुरस्कार वर्ष १९०१ पासून सुरू करण्यात आले. पुरस्कार स्वीडिश शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त सुरू झाले. अल्फ्रेड यांनी स्फोटक डायनामाइटचा शोध लावला होता. प्रथम नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औषध, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांत देण्यात आले.

नोबेल यांचा जन्म स्टॉकहोममध्ये १८३३ मध्ये झाला होता. नोबेल त्यांचे वडील सैन्यासाठी शस्त्रे बनवत असत. १८६७ मध्ये नोबेलनं अत्यंत प्रभावी स्फोटक शोधले होते. परंतु याचा वापर युद्धात केल्या गेल्या नंतर जो विध्वंस झाला त्यामुळं ते निराश झाले. नोबेल पारितोषिक सुरू होण्याबद्दल त्यांनी मृत्युपत्रात उल्लेख केला होता. नोबेल यांचं १० डिसेंबर १८९६ रोजी निधन झालं. या कारणास्तव, दरवर्षी १० डिसेंबर रोजी विविध क्षेत्रात नोबेल पुरस्कार जाहीर केले जातात. हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा