ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा …

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२ : अंधेरी पोट निवडणुकीत ऐन मोक्याच्या क्षणी मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत अशीही घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांना निवडणूक बिनारोष लढण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यानुसार ही चाल खेळली गेली असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी अंधेरीत राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पण खरं राजकारण तर आता सुरु झालं आहे. जर ही आगामी निवडणुकीची पायाभरणी असेल तर आता राज ठाकरे यांच्या सांगण्यानुसार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. मग मनसे बाळासाहेबांच्या शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मदत करणार का? हा सवाल उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे ऋतुजा लटकेच्या विजयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला स्फुरण चढणार असून त्यामुळे आता ते कुठलं पाऊल उचलणार याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यावर ऋतुजा लटके यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत. पण निवडणूक संपली असली तरी रण मात्र आता सुरु झाले आहे. आता कोण कोणाची बाजू घेणार आणि कोणाविरुद्ध लढणार हे, पहाणं महत्त्वाचं ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा