गोल पोस्ट इतर पवारांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीस्वाराला उडविले

पवारांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीस्वाराला उडविले

नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून दोन दिवसांच्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांचा ताफा भरसिंगीहून खापा गावाकडे निघाला होता. त्यावेळी पवार यांच्या ताफ्यातील एका बोलेरो गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली.
यात दुचाकीस्वाराला दुखापत झाली आहे. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीवर दोन तरुण जात होते. त्यातील गाडी चालकाला मोठी दुखापत झाली आहे.दुचाकीचालकवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी घटनास्थळी पवारांच्या सोबत असणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचारकेले. सध्या त्या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे

error: Content is protected !!
Exit mobile version