मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना (२०११) साली एका माथेफिरू तरुणाने हल्ला केला होता. या हल्ला करणाऱ्या अरविंदर सिंग नावाच्या तरुणाला आठ वर्षांनी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शरद पवार दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये असताना एका कार्यक्रमा दरम्यान हा हल्ला केला होता.
हल्ला केल्यानंतर अरविंदर फरार झाला होता. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने २९१४ मध्ये त्याला गुन्हेगार घोषित केले होते. त्यानंतर म्हणजे आठ वर्षांनंतर अरविंदरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीत ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या अरविंदर सिंगने आपण महागाईमुळे आणि भ्रष्टाचाराने वैतागलो आहे आणि योजना करून कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करायला आलो होतो असं सांगितलं होतं. याशिवाय त्याच्याकडे असलेलं धारदार शस्त्रही उपसलं होतं. पण सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याला दूर ढकललं होते.
शरद पवार यांनी त्यावेळी या प्रकरणाला जास्त महत्व देण्याची गरज नाही असं म्हटलं होते.