पावसामुळे शेतकऱ्यांच्या भुईमुगाच्या शेंगा गेल्या वाहून

अमरावती, दि,१३ जून २०२०: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी , विक्री साठी आणलेल्या भुईमूगाच्या शेंगा मुसळधार पावसात पूर्णपणे भिजून अनेक पोतीे पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा पावसाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे पहायला मिळाले. पावसामुळे जवळपास ७० ते ८० पोते भुईमूग भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अमरावती येथील बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आपले धान्य विकायला आणत असतात. मोठ्या प्रमाणात शेंगा असल्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमूग शेंगा विकायला आणला होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ठेवलेल्या शेडमध्ये पाणी शिरल्याने तिथे ठेवलेल्या शेंगा भिजल्या.

अचानक आलेल्या पावसामुळे पाणी शेडमध्ये शिरले आणि बाजार समितीमधील ब्लॉक असलेल्या नाल्यामुळे पाणी थेट बाजार समितीच्या आवरमध्ये शिरले त्यामुळे सर्व शेंगांची पोती भिजून गेली.

जवळपास ३० ते ४० पोती भुईमुगाच्या शेंगा पाण्यात वाहून गेल्या तर ७० ते ८० पोती पाण्यात पूर्णपणे भिजली. त्यामुळे या भुईमुगाच्या शेंगा विकायचा तर कोणाला? असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा