पेटीएम पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२०: पेटीएम पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. हे गुगल प्ले स्टोअरमधून काही काळासाठी काढलं गेलं होतं. पेटीएमनं अलीकडंच फॅन्टसी लीगची सुरूवात केली होती आणि आयपीएल २०२० देखील आजपासून सुरू होत आहे.

पेटीएमनं निवेदनात म्हटलं आहे की कंपनी आता गुगलच्या पॉलिसी रिक्वॉरमेंट नुसार कॅशबॅक कॉम्पोेनेंट काढून टाकत आहे. तथापि कंपनीनं म्हटलं होतं की हे तात्पुरतं स्वरूपाचं आहे.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की ड्रीम ११ आयपीएल २०२० आजपासून म्हणजे १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटशी जोडलेले फॅन्टसी लीग आधारित अॅपची शर्यत वेगवान झालीय. कारण ड्रीम ११ हे प्ले स्टोअरवर नाही आणि याचं कारणही गूगलची पॉलिसी आहे.

अशा परिस्थितीत फॅन्टसी लीग आधारित स्पोर्ट्स गेमिंगसाठी तयार केलेल्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीनं गुगलला हे पेटीएम अॅप काढून टाकण्यास सांगितलं होतं.

पेटीएमनं निवेदनात म्हटलं आहे की हे स्पष्ट आहे की पेटीएमवरील प्रत्येक क्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे, आम्ही कॅशबॅक कॉम्पोेनेंट तात्पुरतं काढून टाकला आहे जेणेकरून ते गूगल प्ले स्टोअरच्या पॉलिसी रिक्वॉरमेंट पूर्ण करू शकेल.

एफआयएफएसनं गूगलला असे अॅप्स काढण्यास सांगितले. प्ले स्टोअरमधून पेटीएम काढल्यानंतर एफआयएफएसनं गूगलचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा