महापुरात धोका! पवना-मुळा-इंद्रायणीच्या ‘ब्लू लाईन’मधील १,६८६ अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदीपात्रात उभारलेल्या १,६८६ अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई सुरू केली आहे! पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेत असलेली ही बांधकामे (ज्यात घरे, दुकाने आणि भंगार अड्डे यांचा समावेश आहे) महापालिकेच्या सर्वेक्षणानंतर धोक्याची घंटा ठरली आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार, सर्व मालमत्ताधारकांना नोटीसा बजावल्या असून कारवाईची टांगती तलवार आहे. महत्त्वाचे म्हणजे, सामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी या बाधित बांधकामांची यादी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर केली गेली आहे. त्यामुळे आता या पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामांची नोंदणी किंवा खरेदी-विक्री व्यवहार होणार नाही. कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी शासकीय पडताळणी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे