बीड जिल्ह्यात दुचाकीवर डबलशीट फिरल्यास होणार दंड

बीड, दि.२ जून २०२० : बीड जिल्ह्यात पाचव्या लॉकडाऊननंतर बर्‍यापैकी सुट देण्यात आली आहे. सुट देण्यापुर्वी राज्य शासनाने अनेक नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे दुचाकीवर फिरताना एकच व्यक्ती असणे ही महत्त्वाची अट आहे. त्यामुळे नागरीकांनी दुचाकीवर डबल सीट बीड जिल्ह्यात फिरू नये, अन्यथा त्याला जागेवरच दंड द्यावा भरावा लागेल अशा सक्तीच्या सूचना वाहतूक पोलीसांना वरिष्ठांनी दिल्या आहेत.

नागरीकांनी कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने दुचाकीसाठी एक, तीन चाकीसाठी ३, चार चाकीसाठी ३ असे नियम घालून दिले आहेत. मात्र बीडच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी घेवून नागरीक फिरतात, अशा वेळी एका दुचाकीवर एकच व्यक्ती असणे बंधनकारक आहे. जर नागरीकांकडे सर्व कागदपत्रे असतील अन तो डबलसीट असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा