नागपुर जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा

नागपुर, ४ नोव्हेंबर २०२२: नागपुर जिल्हा परिषदेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे‌. मृतकांच्या नावाची पेंन्शन रक्कम जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली जात होती. हा सर्व प्रकार गेल्या सात ते आठ वर्षापासून सूरु होता. यात एक कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आलंय.

जिल्हा परिषद सीईओ यांनी चौकशी समिती स्थापन केलीय. या पेंन्शन घोटाळ्यात आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तवली जातेय, या महिला लिपिकाकडं शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेंन्शचं काम होतं. ही महिला सेवानिवृत्तीनंतर मृत झालेले कर्मचारी हयात असल्याचं दाखवित त्यांची पेंन्शन आपल्या जवळील नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा करत होत्या.

गेल्याकाही महीण्यापासून महिला रजेवर असल्यानं तिचं काम दुसरा कर्मचारी करत होता. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. या नंतर चौकशी केली असता अहवालाच्या आधारे संबंधित महिलेला निलंबित करण्यात आलं असून चौकशी समितीही स्थापन करण्यात आलीय.

समिती अहवाल आल्यावर पुढील प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असं नागपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा