बीड मधिल ‘उमेद’ बचत गटातील महिलांच्या दिवाळी फराळ आणि इतर उत्पादनांची नागरिकांनी खरेदी करावी – दिपा मुधोळ (मुंडे) बीड जिल्हाधिकारी

बीड, ९ नोव्हेंबर २०२३ : ‘उमेद’ अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटांनी तयार केलेल्या, दिवाळी फराळ, सजावट साहित्याची विक्री व प्रदर्शनाचे जिल्हा परिषद बीड येथे, ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सदरील भव्य विक्री प्रदर्शनास बीड शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सहभाग दिसून आला.

आज दीपा मुधोळ (मुंडे) जिल्हाधिकारी बीड, यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बीड शहरातील सर्व नागरिकांना, सामाजिक संस्थाना, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना आवाहन केले की, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरु असलेल्या या बचत गटातील गरीब महिलांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून येथील फराळ आणि इतर साहित्य खरेदी करावे. दिवाळी सणानिमित्त ग्रामीण भागात स्वताच्या हाताने, स्वच्छता ठेवून तयार केलेले लाडू, करंजी, शेव, चिवडा, सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ तसेच चॉकलेट, पणत्या, आकाश कंदील, भेटवस्तू हे सगळंच चांगल्या प्रतीचं आहे, त्याची सगळ्यांनी खरेदी करावी असे आवाहन मा. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ (मुंडे ) व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी केले.

यावेळी प्रकल्प संचालक श्रीमती संगीतादेवी पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वासुदेव सोळुंके, जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख याठिकाणी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी बचत गटांनी तयार केलेल्या फराळाची चव घेऊन गटातील महिलांची प्रशंसा केली. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात येथील वस्तू आणि फराळाची खरेदी करून बचत गटातील सर्व नवउद्योजक महिलांचे कौतुक केले.

या प्रदर्शनामध्ये धारूर तालुक्यातील गटाने ज्वारी पासून तयार केलेली शेव, बाजरीच्या शंकरपाळ्या या पदार्थाचे तसेच वडवणी तालुक्यातील सागवानी बैलगाडी, महिलांनी स्वतः तयार केलेला दिवाळी फराळ, मसाले त्यांची पॅकेजिंग- लेबेलिंग या बाबत मा. जिल्हाधिकारी यांनी महिलांचे विशेष कौतुक केले. सदरील विक्री व प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रकल्प संचालक श्रीमती संगीतादेवी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्रीमती त्रिवेणी भोंदे, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग शकील शेख, जिल्हा व्यवस्थापक श्रीमती आशा पवार, जिल्हा व्यवस्थापक श्री मुरहारी सावंत, श्रीमती रश्मी गोसावी, संजय गायकवाड, शैलेश चौधरी, महेश कुलकर्णी, गोकुळ नागरगोजे, विठल चव्हाण, युवराज गारदे, विजयकुमार वैष्णव, मनीषा दाळिंबकर, प्रीतम भोंडवे, राजेश आदमे, आनंद भोकरे, तुफैल शेख, परवीन शेख, इरफान शेख, राहुल ढोकणे, कुणाल बडवाईक, अशोक तारगे, अमरनाथ गाभूळ, बाबासाहेब शेजाळ, रोहिदास गोरे, शकुंतला जावळे, वैशाली देवकाते, आकाश मोरे, राहुल वाघमारे इत्यादी लोक परिश्रम घेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनीधी : अरुण गित्ते

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा