कोविडमुळे लोक मरत होते आणि तुम्ही पैसे कमवत होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टिका

6

मुंबई २५ जून २०२३: महाराष्ट्रातील ईडीच्या छाप्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले आहे. याच क्रमाने त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना टोला लगावला. ते म्हणाले की, कोविडमुळे लोक मरत असताना तुम्ही या आपत्तीतही संधी शोधली आणि भरपूर पैसा कमावला. ५०० रुपये असलेली बॅग तुम्ही ६००० रुपयांना विकली. हा भ्रष्टाचार आहे आणि त्यासाठी ईडीची चौकशी होत असेल तर ती होऊ द्यावी. कोविड घोटाळ्यातील आरोपींना घाबरण्याची, ईडीला गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिला.

फडणवीसांनंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी एकजुटीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तुम्ही मुख्यमंत्री असताना दोन दिवसही नीट मंत्रालयात येऊन बसला नाही. पण सत्तेसाठी काल पाटण्याला गेला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचारही तुम्ही बाजूला ठेवले. हिंदुत्व आणि कलम ३७० ला विरोध करणाऱ्या मेहबुबा मुफ्तींच्या तसेच चारा घोटाळा करणारे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत शेजारी जाऊन बसला. आता तुम्ही कोणत्या चेहऱ्याने जनतेत जाऊन भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढणार असा सवाल त्यांनी केला.

मराठा मंदिराचा अमृत महोत्सव निमित्ताने एकनाथ शिंदे शरद पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पावसात गेले होते. या कार्यक्रमात ते आणि या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार एकत्र होते. आपला अहंकार बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे. या राज्याला सर्वात पुढे न्यायचे आहे,त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा