कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंब येथे लोकप्रतिनिधींची आढावा बैठक

उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसिल कार्यालय, कळंब येथे आरोग्य विभाग,पोलीस विभाग, महसूल प्रशासन, महावितरणने केलेल्या उपाययोजना संबंधी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकिय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक,सरपंच, ग्रामसेवक,आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,पोलिस पाटील हे अविरत पणे झोकुन देऊन प्रामाणिकपणे आपल्या सेवा देत आहेत याबद्दल ही आभार व्यक्त केले.
सेवाभावी संस्था,स्थानिक नागरिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊन एकही कुटुंब किंवा व्यक्ती उपाशी राहणार नाहीत याबद्दल कार्यरत असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

या बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, उपविभागीय अधिकारी गाठाळ मॅडम, तहसीलदार मंजुषा लटपटे, कळंबचे पोलिस निरीक्षक दराडे , श्रद्धांनंद पाटील, पुरवठा नायब तहसीलदार पठाण ,महावितरणचे कनिष्ठ अभियंता हिप्परकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, नगरसेवक आनंद वाघमारे, मुस्तफ कुरेशी आदि उपस्थित होते.

दक्षतेबाबत केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे:

◆ लॉकडाऊनच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची दक्षता आहे

◆रेशनिंग दुकानदारांनी शिधा पत्रिका धारकांनी तक्रार येणार नाही किंवा धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

◆आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःच्या आरोग्याला सांभाळून सुरक्षा किटचा वापर करावा

◆ आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने द्याव्यात.

◆पोलिस प्रशासनाने लॉकडाऊन च्या काळात काटेकोर पणे नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाचा फैलाव वाढणार नाही यासाठी प्रयत्न करावेत

◆शेतकऱ्यांना शेतातील असणारा माल बाजारात घेऊन जाताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबतीत काळजी घ्यावी.

                                                                                                          प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा